You are currently viewing शीघ्रपतनाणे त्रस्त असाल तर वाचाच.

शीघ्रपतनाणे त्रस्त असाल तर वाचाच.

  • Post author:
  • Post category:Blog
  • Post comments:1 Comment

पुरुषाचा सेक्स हा लिंगामध्ये कमी आणि डोक्यात जास्त असतो

(Premature ejaculation )खरं तर शीघ्रपतन हा काही आजार नाही. ती एक सवय आहे. पुरुषांच्या लैंगिक प्रतिसादात लैंगिक उत्तेजना, शिश्नाची ताठरता व वीर्यस्खलन या प्रक्रिया होतात. स्खलन झाल्यानंतर ताठरता कमी होत-होत नष्ट होते. शीघ्रपतनावर उपचार करताना या लैंगिक प्रतिसादावर विशेष लक्ष द्यावं लागतं.

‘डॉक्टर लग्नाला दोन महिने झाले, पण शारीरिक संबंधात मी फारच कमी पडतो. मला तिचं समाधान करता येत नाही. मी फार आधीच संपतो. यामुळे मला आता रोज रात्री घरी जाण्याचीच भीती वाटते. आता तर माझ्यातलं पौरुषत्व संपल्यासारखं वाटतं. काय करावं तेच समजत नाही’, २९ वर्षाचा तरुण मला ही गोष्टी फार उद्विग्नपणे सांगत होता. तो फार हताश झालेला होता. लग्नानंतर लगेचच त्याचे शारीरिक संबंध स्थापित झाले. परंतु त्यात त्याचं वीर्यस्खलन लवकर होत होतं. त्यामुळे पत्नीचं समाधान होत नव्हतं. या सर्व प्रकारामुळे त्याला मानसिक दडपण आलं होतं. त्याची भीती अजूनच वाढू लागली. त्यातच तो अविवाहित असताना कधी-कधी हस्तमैथुन करत असे. त्याने कुठेतरी वाचले की हस्तमैथुनामुळे नपुंसकत्व येतं, म्हणून तो फारच घाबरलेला होता.

‘ही फार कॉमन समस्या असून, यावर योग्य उपचार घेतत्यास ती बरी होऊ शकते’, हे त्याला मी सुरुवातीलाच समजावून सांगितलं. खरं तर शीघ्रपतन हा काही आजार नाही. ती एक सवय आहे. पुरुषांच्या लैंगिक प्रतिसादात लैंगिक उत्तेजना, शिश्नाची ताठरता व वीर्यस्खलन या प्रक्रिया होतात. स्खलन झाल्यानंतर ताठरता कमी होत-होत नष्ट होते. शीघ्रपतनावर उपचार करताना या लैंगिक प्रतिसादावर विशेष लक्ष द्यावं लागतं. लैंगिक संबंधात उत्तेजना व वीर्यस्खलन या दोन क्रियांमध्ये बरंच अंतर असतं. पण अनुनभवी व नवपरिणीत पुरुषांमध्ये हे अंतर फारच कमी असतं. त्यांची उत्तेजना फार लवकर परमोत्कर्षापर्यंत पोहोचते व वीर्यस्खलन ताबडतोब होतं. यात बऱ्याच जणांना प्रश्न असतो की, संबंध किती वेळ टिकायला हवा, पण याचं एकसारखं उत्तर देणं अशक्य आहे. उत्तेजना ते स्खलन यातील वेळ प्रत्येक पुरुषामध्ये वेगवेगळा असू शकतो. काहींमध्ये हा फारच कमी असल्याने वरील तरुणासारखी अवस्था निर्माण होते.

This Post Has One Comment

Leave a Reply